रावेर तालुक्यातील खिरोद्यात एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न

क्राईम रावेर

रावेर : तालुक्यातील खिरोदा येथील सेंट्रल बँक शाखेत २२ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी एटीएम मशीनची तोडफोड करून नुकसान केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ शाळेच्या गेटसमोर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम २२ रोजी रात्री ९ ते २३ रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी एटीएम मशिनच्या शटरची दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश केला व एटीएम मधील रकमेची चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. सावदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *