नंदुरबारला उघडणार आजपासून शाळा, जळगाव जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत बंद

Social कट्टा कट्टा जळगाव धुळे नंदुरबार माझं खान्देश

नंदुरबार प्रतिनिधी >> राज्याप्रमाणेच खान्देशातही शाळा उघडण्यावरून प्रशासनाचे वेगवेगळे निर्णय समोर आले. तर धुळे जिल्हा प्रशासन अजूनही संभ्रमात असून, आज सोमवारी बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात सोमवारपासून शाळा उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. जळगाव जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात सध्या २४३ कोरोनाचे रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव कमी आहे. त्यामुळे सोमवार (दि. २३)पासून जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. एम.व्ही. कदम यांनी दिली. दरम्यान, शाळेत मास्कसह इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुडे यांनी केले आहे.