मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी
कासोदा ता, एरंडोल जि , जळगाव येथील दिव्यांग व्यावसायिक श्री योगेश लोटन चौधरी हे कासोदा गावात मागील 12 वर्षापासून इले. व झेराॅक्स मशिनचा व्यवसाय करत आहे. चौधरी हे 70% दिव्यांग असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. ते कासोदा गावात सुरवातीपासून एका खाजगी भाडयाच्या दुकानात भाडयाने दुकान घेवून व्यवसाय करत होते. परंतु दुकानाचे भाडे जास्त असल्याने त्यांना ते परवडणारे नव्हते. शिवाय घरची परिस्थिती बिकट असल्याने या व्यवसायावरच त्यांचा व परिवाराचा उदरनिर्वाह चालत असे. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी मागील 1 वर्षापासून शासन निर्णयानुसार कासोदा ग्रामपंचायतीकडून बांधण्यात येणार्या व्यवसाय संकुलातील गाळयांमध्ये एका गाळयाची मागणी ही दिव्यांग कोटयातून व्यवसाय करणेसाठी मिळावा असा अर्ज केला. परंतु वारंवार मागणी करून देखील त्यांना ग्रामपंचायतीकडून फक्त तोंडी आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. शिवाय कोरोना महामारीमुळे व व्यसाय बंद असल्याने त्याने घेतलेले दुकानही त्यांना सोडावे लागले. अशा परिस्थित त्यांनी आपला आत्मविश्वास न डगमगू देता गावातच त्यांनी एक छोटीशी टपरी भाडयाने घेतली. परंतु त्या टपरित त्यांना जेमतेम बसण्यासाठीही जागा उपलब्ध नसून शेवटी त्यांनी आपल्याला कासोदा ग्रामपंचायतीने एक गाळा व्यवसाय करणेसाठी दयावा या मागणीसाठी त्यांनी शेवटी एरंडोल पंचायत समिती जवळ दिनांक 14 आॅगस्ट 2020रोजी आपल्याला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसणार आहोत असे लेखी निवेदन त्यांनी मा. मुख्यमंञी, मां ग्रामविकास मंञी, मा. राज्यमंञी ओमप्रकाश उर्फ बच्चु भाऊ कडू, मा. सामाजीक व न्याय मंञी, जिल्हाधिकारी जळगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव , मा. पोलीस निरीक्षक एरंडोल व पंचायत समिती एरंडोल यांना देण्यात आले असून सर्वएरंडोल जबाबदारीही प्रशासनाची राहील असे त्यात नमूद करणेत आले आहे.
