एरंडोल कासोदा येथील घरफोडी प्रकरणी एकाला अटक

एरंडोल क्राईम

जळगाव >> एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथून घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आजस हिरालाल मोहिते (वय-१९ रा. वनकोठे ता.एरंडोल) असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की. एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथील एक तरुण गवंडी काम करीत असताना कासोदा गावात चोऱ्या करत असतो. पोलिसांच्या पथकाने आजस हिरालाल मोहिते याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशी केल्यानंतर आजच याने १२-१३ऑक्टोंबरच्या मध्यरात्री दिनेश दिलीप साळुंखे (रा. सोनार गल्ली, कासोदा) यांच्या घरात प्रवेश करून चोरी केली होती. दरम्यान आजचा मोहितेला पुढील तपासकामी कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयित आरोपीकडून एरंडोल, कासोदा, पारोळा येथील घरफोडी उघडकीस येण्याची शक्यता आहे.