३ लाखांसाठी विवाहितेस मारहाण, सासरच्या ६ जणांवर गुन्हा

एरंडोल कासोदा क्राईम निषेध

एरंडोल >> कासोदा (ता.एरंडोल) येथे खासगी आयटीआय सुरु करण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेस मारहाण, शिवीगाळ प्रकरणी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

शहरातील परदेशी गल्लीतील रहिवासी वैशाली स्वप्नील चौधरी हिला तिचे पती, सासू, सासरे, जेठ, नणंद व मावस सासरे हे विवाह झाल्यानंतर खासगी आयटीआय सुरू करण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, अशी मागणी करत होते.

तसेच तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेणे, मुलगी झाली या कारणावरून छळ सुरू होता. त्यामुळे वैशालीच्या यांच्या तक्रारीवरून पती स्वप्नील अशोक चौधरी, सासरा अरुण बळीराम चौधरी, सासू कमलबाई अरुण चौधरी, नणंद राजश्री अभिजित चौधरी, जेठ महेंद्र अरुण चौधरी, मावस सासरे मधुकर बळीराम चौधरी यांच्याविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.