कंजरवाड्यात प्रशासनाकडून उदासीनता ? : आपला जळगावकर

Jalgaon कट्टा जळगाव ब्लॉगर्स कट्टा

जळगाव : येथील कंजरवाडा भागातील संध्याकाळी सहा वाजता एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून परिसरात खळबळ वय वर्ष ६५ वृद्ध आढळून आले तरी प्रशासन, मनपा, पोलीस, नगरसेवक,कुठेही दिसत नाही एक अधिकारी सुद्धा या भागात फिरकला नसुन हा भाग झोपडपट्टीभाग असून तेथील गोरगरीब,हातावर पोट असणारे लोक धास्तावले आहे प्रशासनाकडून फक्त अर्धवट पत्रे लावून दिले आहे या भागातील रुग्णाच्या गल्लीत जर पत्रे लावून कोरोना जात असेल तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्त भागात सगळीकडे फक्त पत्रे लावून कोरोनाला हरवले जाणार का? हा वृद्ध व त्याची पत्नी रुग्ण हे पुणे येथे जाऊन आले असे त्या सदरील भागातील नागरिकांन मध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे संबंधित अधिकारी डॉक्टर अत्ता पावेतो दिसत नाही दुसऱ्या भागात प्रशासन अति उत्स्फूर्तपणे काम करत दिसत असून या भागात का जनावरं रहातात का? असा सवाल कंजरवाडा भागातील नागरिक करीत आहे. हा भाग पूर्णपणे सॅनिट्झ करण्यात यावे रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेला या भागातील सामाजिक कार्यकर्ते सहकार्य नक्कीच करेल अशी आशा बाळगतो.

आपला जळगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *