शाळेच्या संरक्षण भिंतीचे कळमसरे येथे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

Politicalकट्टा अमळनेर

अमळनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील कळमसरे येथे जिल्हा परिषद शाळेसाठी कळमसरे डांगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व रोजगार हमी योजना आणि १४ वित्त आयोगाच्या फंडातून मंजूर करण्यात आलेल्या ८ लाख रुपये किमतीच्या दोन शाळा खोल्या,शाळेला संरक्षण भिंतीसाठी २३ लाख व गाव हाळसाठी २ लाख रुपयांचा कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी सरचिटणीस सुरेश पाटील,काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,एल टी पाटील,सरपंच कल्पना पवार , माजी उपसरपंच जितेंद्र राजपूत,झुलाल चौधरी ,जेष्ठ कार्यकर्ते अशोक चौधरी, ग्रामसेवक एस डी सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कन्या शाळेला संरक्षण भिंत व २ लाख रुपये निधीची गुरांना पाणी पिण्यासाठी गावहाळचे भूमिपूजन करण्यात आले, नंतर आमदार अनिल पाटील यांनी आपल्या प्रयत्नाने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला पीक विम्याची रक्कम मंजूर करून दिलासा दिल्याने शेतकरी कृती समिती कडून सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषदेसाठी संरक्षण भिंत मंजूर करून निधी उपलब्ध झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश राजपूत व उपाध्यक्ष हेमंत चौधरी यांनी सत्कार केला ,यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे ,उपशिक्षक किशोर शिसोदे ,कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी,ग्रामपंचायत सदस्य यशोदाबाई निकम व सुनंदा चौधरी, अशोक चौधरी, पत्रकार वसंतराव पाटील, बाबूलाल पाटील,गजानन पाटील, आबा महाजन,अंबालाल राजपूत ,भागवत कोळी, देविदास चौधरी ,दिनेश राजपूत, राजेंद्र चौधरी,भूषण पाटील, रमेश पाटील, विकास पाटील,नंदू शर्मा ,नरेंद्र मिस्तरी, दिपचंद छाजेड, गुलाब महाजन आदींसह कळमसरे, पाडळसरे, निम येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

गजानन पाटील अमळनेर✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *