संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

Social कट्टा कट्टा चाळीसगाव

चाळीसगाव राज देवरे प्रतिनिधी >> महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीने संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा ‘संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आणि आजचा तेली समाज’ या विषयावर होईल. त्यात सहभागी स्पर्धकांना ७०० ते ८०० शब्दात निबंध लिहिला लागेल. त्यावर नाव, पत्ता, संपर्क क्रमांक लिहून तो umesh.chaudhari311@gmail.com या मेलवर ८ डिसेंबरपर्यंत पाठवावा लागेल.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी सर्व वयातील महिला व पुरुषांसाठी खुली असून अधिक माहितीसाठी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.