जामनेर तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानात चक्क चालतोय जुगार अड्डा!

क्राईम जामनेर

जामनेर प्रतिनिधी :> तालुक्यातील देवपिंप्री येथील भर चौकातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात चक्क जुगारा अड्डा चालतो. या प्रकाराने गावातील वातावरण दुषीत होऊ शकते, विशेष म्हणजे जुगार शौकीन नागरीक खेळण्यासाठी दुरवरून येथे येत असल्याचेही सांगण्यात येते.

संबंधीत स्वस्त धान्य दुकान हे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व माजी बाजार समिती सभापती तुकाराम निकम यांच्या पत्नीच्या (सौ लताबाई तुकाराम निकम) नावावर आहे, आणी त्या रास्तभाव दुकानामध्ये प्रत्येक महिन्यात दोन-तीन दिवसात धान्यवाटप करण्यात आले की चक्क या ठिकाणी जुगार अड्डा बसलेला दिसून येतो. दुसरे विशेष म्हणजे या देवपिंप्रीतील स्वस्त धान्य दुकानातील जुगार सुरू असल्याची चक्क व्हिडीओ क्लीप तालुकाभरात फिरू लागल्याने वरील बड्या भाजप नेत्याची चांगलीच पंचाईत झाल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाईची मागणी
या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे यांच्या लेटर पॅड वर लेखी स्वरूपातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत पुरवठा अधिकारी व तहसिलदार अरूण शेवाळे यांचेकडे संबंधीत स्वस्त धान्य दुकानातील जुगार अड्डा बंदकरून परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली,स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाकडुन कायदेशीर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

निवेदनाच्या प्रती राज्याचे अन्न-पुरवठा मंत्री,जिल्हाधीकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी सामाजीक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष संदिप हिवाळे,पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष जितेश पाटील,तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसें , न्या नेश्वर पाटील,सागर कुमावतसह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *