शाळेतील स्कूलबस चालकासोबत पळून गेलेल्या शिक्षिकेला पोलिसांनी काढले हुडकून

क्राईम जामनेर पाेलिस

जामनेर प्रतिनिधी ::> शाळेत शिक्षिका असलेली महिला शाळेतील स्कूलबस चालकासोबत पळून गेली होती. या महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची फिर्याद कुटुंबीयांनी दिली होती. दरम्यान, १४ महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेस बुधवारी पुणे येथून हुडकून काढले.

जामनेर तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील शाळेतील २८ वर्षीय शिक्षिका २३ सप्टेंबर २०१९ रोजी बेपत्ता झाली होती. याच दिवसांपासून शाळेतील स्कूलबसचा चालकही बेपत्ता झाला होता. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, विनोद पाटील, रमेश कुमावत, योगेश महाजन, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने संबंधित महिलेस बुधवारी पुण्यातून ताब्यात घेतले.