जामनेर-शहापूरच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

अपघात आत्महत्या क्राईम जामनेर

जामनेर >> तालुक्यातील शहापुर येथील रहिवाशी दीपक राजेंद्र सपकाळ (वय २२) हा युवक २६ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. मृत दीपक हा गावात गिरणी व किराणा दुकान चालवत होता.

किराणा माल आणण्यासाठी तो २६ रोजी जामनेरला आला होता. मात्र, त्यानंतर बोदवड-जामनेर रस्त्यावरील लहासरफाटा परीसरातील भवानी जंगलात त्याचा मृतदेह आढळला.

घटनास्थळाजवळच त्याची दुचाकी आढळली. याप्रकरणी जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.