प्रहार जनशक्ती पक्षाचे जामनेर तालुकाध्यक्ष यांच्याशी गैरवर्तणूक केल्याबाबत मयूर पाटील यांचे तहसीलदार यांना निवेदन

Politicalकट्टा कट्टा जामनेर

जामनेर ,भुषण जाधव – दि 3 नोव्हेंबर रोजी प्रहार चे युवा तालुकाध्यक्ष मयूर पाटील यांनी जामनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे कोरडवाहू विकास प्रकल्प कोदोली अंतर्गत या विषयाची माहिती माहीतीच्या अधिकारात रितसर मागितली असता दि.3 नोव्हेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात अपिलीस बोलवण्यात आले असता तालुका कृषी अधिकारी यांच्या समोर कृषी सहायक कोदोली यांना मयूर पाटील नी माहिती मागितली असता मनात राग व द्वेषाची भावना ठेवून गैरवर्तणूक व दमदाटी व शिवीगाळ केली.

सदरील अधिकाऱ्यांची ही वर्तवणु प्रहार या पक्षाची व तालुका पदाधिकाऱ्याची अपमानास्पद व घ्रुणास्पद अवहेलना केल्यासारखे दिसून येत आहे त्या बद्दल प्रहार जनशक्ती पक्ष खेंद व्यक्त करतो व निषेध व्यक्त करतो सदरील अधिकाऱ्यांस अपनाकडुन व तालुका कृषी अधिकारी यांच्या कडुन समज देण्यात यावी व समस्त पदाधिकारी व जनतेशी कशा पद्धतीने संवाद करावा याबाबत सुचना करण्यात देण्यात यावी व यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सन्मानाने वागणुक देण्यात यावी.

अन्यथा आम्ही अपणा भिडु बच्चु कडु यांचा दणका दाखवुन देऊ अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार जामनेर याना प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष मयूर पाटील, तालुका सचिव दीपक तेंदूरकर, अशोक पाटील जामनेर आदी उपस्थित होते.