मुलीच्या फिर्यादीवरुन वडिलांसह भावांवर गुन्हा

क्राईम जामनेर

जामनेर >> वडीलांनी व दोन भावांनी फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन तालुक्यातील देवपिंप्री येथील रहिवासी तथा भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह तीन जणांविरुद्ध जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

तुकाराम निकम यांच्या पत्नी लताबाई निकम यांच्या नावाने देवपिंप्री येथे स्वस्तधान्य दुकान होते. लताबाई निकम यांचे दि.२४ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले असून, हे धान्य दुकान प्रदीप तुकाराम निकम यांच्या नावावर करण्यात आले आहे. त्यासाठी ३० ऑक्टोबर २०२० रोजी तुकाराम निकम यांच्या कन्या उज्ज्वला रवींद्र पाटील या उपस्थित नसताना, त्यांची उपस्थिती दाखवून हे दुकान प्रदीप निकम यांच्या नावावर केले आहे.