जामनेरच्या कोविड सेंटरमध्ये माजी मंत्री तथा आ.गिरीश महाजन यांनी साधला रुग्णांशी संवाद

Politicalकट्टा जामनेर

जामनेर, भुषण जाधव :>> संपूर्ण विश्वामध्ये करोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना आपल्या निडर बाण्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी प्रत्यक्ष कोविड सेन्टर मध्ये जाऊन करोना रुग्णांशी संपर्क साधला.


आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या देखरेखीखाली जामनेरच्या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची जेवण चहा नाष्टा पाण्याची व्यवस्था होत आहे आज जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोविड सेंन्टर मध्ये करोना रुग्णांशी संवाद साधला.

या विषयावर कार्यक्रम होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार गिरिषभाऊ महाजन हे उपस्थित होते. तहसीलदार अरूण शेवाळे.जिएम फाउंडेशनचे आरोग्यदुत अरविंद देशमुख. आरोग्यदुत अक्षय जाधव. आदीनी कार्यक्रमास उपस्थिती दिली.

यावेळी जळगाव चे मानसिक आरोग्य अभियानाचे समुपदेशक प्रमुख दौलत निमसे, ज्योती श्याम पाटील यांनी करोना रुग्णांची कौन्सिलिंग करून करोना बाबतची भीती दूर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *