जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे मुलीच्या तोंडात पायातील चप्पल देऊन गावभर फिरवले?

जामनेर

जामनेर >> तालुक्यातील शेंगोळा येथील एका कुटूंबातील एक कुमारीका ही काही शारिरीक व्याधिनि ग्रस्त होती. कुटूंबातील सदस्याच्याकडून तिच्यावर अनेक औषध उपचार केले. पण गुण येत नाही म्हणून मुलीला बाहेरची बाधा असल्याचा सल्ला नजीकच्या नातेवाईकांनी परिवाराला दिला. सल्यानुसार मुलीच्या वडिलांनी डांभुर्णी (ता. यावल) येथील मांत्रिकास बोलावले मांत्रिकाने मुलीच्या तोंडात पायातील चप्पल धरायला लावून गावातून व गावाच्या आजूबाजूच्या फिरवले. अशा प्रकारे मुलीला हिन वागणूक देवून मुलीवर अघोरी उपचार करण्यात आला. मांत्रिकाने मुलीच्या अंगातील 6 पैकी चार चुडेल काढून मुलीच्या परिवाराकडून भक्कम रक्कम उकळली.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा दुर व्हावी यासाठी आपले बलिदान दिले. तरी ही आज अनिष्ट रूढी परंपरा व अंधश्रद्धा या घटना समाजात दिवसा ढवळया होत असल्याचा प्रकार जामनेर तालुक्यातील शेंगोळा या गावात नुकताच घडला आहे. त्याला अंनिसच्या कार्यक्रर्त्यानि लगाम लावला आहे.

अंनिसचे कार्यकर्त्यांनी कुटूंबाची घेतली भेट
राहिलेल्या दोन चुडेल काढण्यासाठी व पैसे घेण्यासाठी पुन्हा येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष प्रल्हाद बोहाडे व अशोक तायडे याना मिळाल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डिगंबर कट्यारे याच्या मार्गदर्शनानुसार शेंगोळा येथे जावून पिडित कुटुंबाची भेट घेतली. व या पुढे मांत्रिकाकडून अघोरी उपचार करून न घेता वैद्यकीय उपचार चालु ठेवण्याचा सल्ला देण्यात दिला.

योग्य वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून योग्य मार्गदर्शन पिडीत परिवाराला मिळाले व अघोरी उपचार ला आळा बसल्यामुळे गावकरी व त्याच्याकडून अंधश्रद्धा समितीच्या कार्यकर्ते चे आभार मानले या कामी गावाचे पोलीस पाटील जब्बार तडवी व भीमराव दाभाडे यांनी सहकार्य केले.

संदर्भ ; सकाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *