जामनेर तालूक्यातील पिंपळगाव येथे शेतकऱ्याच्या गोडाऊनला आग

जामनेर सिटी न्यूज

पहूर : पिंपळगाव खुर्द ता. जामनेर शिवारातील विलास भाऊराव पाटील यांच्या शेतातील गोडाऊन ला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या आगीत लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. असून दोन बैलांसह म्हशीला आगीची झळ बसली आहे.

दुपारच्या सुमारास शेतीची मशागतीचे काम आटपून विलास पाटील घरी आले होते. या दरम्यान अचानक गोडाऊन ला आग लागली. घटनास्थळी पाटील यांच्या सह ग्रामस्थ धावले. यात पावणे दोन लाखांचे ठिबक संच, तूर, मका व गुरांसाठी ठेवलेली कुट्टी जळाले. घटनेची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयाला वारंवार फोन केले पण प्रतिसाद मिळाला नाही. असे विलास पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *