मनसेनेचा चिलगाव येथील सभा मंडप परिसरातील अतिक्रमण विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा

Politicalकट्टा कट्टा जामनेर

जामनेर भुषण मनोहर जाधव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चिलगाव येथील सभा मंडप परिसरातील अतिक्रमण काढणे व गाव स्वछता मुक्त व दुर्गंधीमुक्त करणे बाबत आजरोजी प स गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले असता या निवेदनात चिलगाव या गावात नुकतेच ग्रा प च्या मालकीच्या जागेत सभा मंडप बांधण्यात येत आहे सदरील सभा मंडप ची जागा च नमुना 8 ला नमूद नसल्याने या परिसरातील कोणत्याही विषयावर ग्रा प हस्तक्षेप करणार नाही असं शासकीय कर्मचारी ग्रामसेवक यांच्याकडून सांगण्यात आले याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खेद व्यक्त करीत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले असता.

सदरील जागा नमुना 8 ला च लागू नसेल तर या जागेवर सभा मंडप नेमक्या कुणाच्या अधिकाराखाली व परवानगी ने बांधण्यात आले या बद्दल ही आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी तसेच गाव स्वछ असेल तर गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहील या आशयाला धरून सभा मंडप परिसरातील शौचालय वैयक्तिक बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आल्याचे या अगोदर च ग्रामसेवक यांना निवेदन स्वरूपात दिलेले असतांना देखील जाणून बुजून दुर्लक्षित केले जात असल्याने व त्याच बरोबर चिलगाव बसस्थानक जवळील महिला शौचालय व गटारींचे दुरवस्था पाहून गावात कुठेही डेंग्यू सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ फवारणी व गावात साफ सफाई व शासकीय महिला शौचालय परिसरातील गवत कापून उपयोगात याव्यात .

व सभा मंडप परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावे अन्यथा दि २६ /११/२० वार गुरुवारी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचायत समितीच्या दालनात कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता सामाजिक अंतर ,मास्क व सॅनिटायझर चा तंतोतंत वापर करून उपोषणाला बसणार आहे. असा इशारा मनविसे चे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील , मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील ,तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील ,वाल्मिक कोळी ,सागर जोशी , अंकुश सकट यांनी गटविकास अधिकारी यांना दिला आहे.