जिल्ह्यात महिलेच धर्मांतरण : लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या मौलवी बाबाची काली करतूत उघड!

Jalgaon क्राईम जळगाव जळगाव जिल्हा जामनेर निषेध पाेलिस

जळगाव प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवीने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून केलेल्या लग्नाची थरारक कहाणी. तसेच या बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबितीची व्यथा एका महिलेने पोलिसांत दिली आहे.

धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोपही पिडीतने केला आहे. या कथित बाबाचे नाव अल्ताप मोहसीन मणियार असं असून त्याने सोशल मिडीयावर अनेक अश्लील आणि अंधश्रद्धेशी संबंधित व्हिडीओ टाकलेले असल्याचे समोर आले आहे.

कौटुंबिक,वैवाहिक कलहातून मुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली संमोहित करून बळजबरीने अनेक विवाहितांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एका कथित मौलवी बाबाचा नुकताच भांडाफोड झालाय.

या महाठगाने बेशुद्ध अवस्थेत शरीर संबंधाचा बनवलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याची आपबिती एका महिलेने मांडली. पीडित महिलेने सांगितले की, २०१७ मध्ये तिला एका मुस्लिम महिलेने अल्ताफ मेहमूद मणियार उर्फ अलिभाई (रा.नेरी दिगर ता.जामनेर) यांचा मोबाईल नंबर दिला. मी त्यांच्याशी संपर्क साधून कौटुंबिक समस्या बाबत माहिती दिल्यावर त्यांनी मी तुमचा कौटुंबिक कलह मिटवून समाधान करून देतो, म्हणत माझ्याकडे ५० हजार रुपये मागितले. मी त्रासलेली असल्याने त्यांना होकार दिला. त्यानंतर एकेदिवशी अल्ताफ हा मला मालेगाव येथून नेरी येथील घर वजा आश्रमात घेऊन आला. त्याच्या घरी आल्यानंतर त्याने मला संमोहित केला. मला त्याने कसे बेशुद्ध केले मला कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर बाबाने मला अश्लील व्हिडीओ दाखवून धमकी देण्यास सुरुवात केली. याच व्हिडीओंचा धाक दाखवून त्याने माझे आधी धर्मांतर केले आणि त्यानंतर लग्न केले. परंतू मी घरी लग्न होऊन नांदायला गेली तेव्हा, त्याच्या घरच्यांनी पहिली पत्नी व मुलगा असल्याचे माझ्यापासून लपविले. तसेच सतत अल्तापच्या खोलीत नेहमी वेगवेगळ्या महिला जात होत्या. त्यावरून मला कळले की, आपल्या प्रमाणे हा अनेक महिलांना फसवून अब्रू लुटतोय. यावरून पिडीत मी त्याच्यासोबत पिडीत विवाहितेने सांगितले. परंतू माझ्याकडे तुझा अश्लील व्हिडिओ आहे. तुला बदनाम करेल म्हणून धमकी देत वेळोवेळी अंदाजे अडीच लाख रुपये उकळले. परंतू एकेदिवशी मी त्याचे घर सोडून माहेरी निघून आले. त्यानंतर एकेदिवशी पोलीसात तक्रार देण्यास जाणार तोपर्यंत अल्तापने माझ्या मुलाचे अपहरण केले. त्यामुळे मी पहिल्यांदा तक्रार देऊ शकली नाही. त्यानंतर सोहेल अन्सारी आणि एका महिलने मला वेळोवेळी येऊन मला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोहेल अन्सारी याने मानसिक त्रास देण्याच्या हेतूने काळा जादू करण्याची धमक देत होता. एवढेच नव्हे तर माझ्याप्रमाणे धुळे, पुणे आणि मुंबई येथील काही महिला देखील अशाच बळी पडल्या असल्याचे देखील पिडीत विवाहितेने सांगितले. दरम्यान, अल्ताफ मेहमूद मणियार उर्फ अलिभाई हा काही प्राण्यांची तस्करी तसेच काळा जादू करतो. रेड मर्क्युरी सारखे स्फोटक पदार्थ बनवितो, असल्याचे देखील पिडीत विवाहितेने सांगितले. जळगाव, मालेगाव येथील पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन देखील कुठलीही कारवाई झाला नसल्याचा आरोप पिडीत विवाहितेने केला आहे.

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह अश्लील आणि अंधश्रद्धेशी संबंधित व्हिडीओ
अलीभाई नाव आणि मोबाईल नंबरवर असलेले युट्युब आणि इन्स्टाग्रामवर या भोंदू बाबाने अनेक अश्लील व्हिडीओ टाकलेले आहेत. त्यात गांडूळ साप, एका तरुणीच्या अंगात येत असल्याचा व्हिडीओसह घाणेरड्या फोटोंचा देखील समावेश आहे. युट्युबवर देखील असेच व्हिडीओ आहेत.

1 thought on “जिल्ह्यात महिलेच धर्मांतरण : लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या मौलवी बाबाची काली करतूत उघड!

Comments are closed.