शेंदूर्णी येथे पत्ता खेळणार्‍या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम पहूर

Read जळगाव

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी येथे पहूर पोलिसांनी धाड टाकून पत्ता खेळणार्‍या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून आज ही कारवाई करण्यात आली आहे.

आज दुपारी एक वाजता चंदर जगन सकट यांच्या घरामागील बाजूला रमेश एकनाथ कोळी (वय ५२ ); प्रकाश अमृत सकट (वय २७ ); प्रभाकर पंडित धनगर (वय ३५ ) आणि चंदर जगन सकट (वय ४३) सर्व राहणार शेंदूर्णी हे पत्ता जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून रोख रुपये १६७५ /- व ५२ पत्त्याचा कॅटसह मिळून आले म्हणून वरील आरोपींतांच्या विरुद्ध मुंबई जुगार अधिनियम १२(अ)प्रमाणे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किरण बर्गे,पोहेका किरण शिंपी, प्रशांत विरणारे, गजानन ढाकणे यांनी ही कारवाई केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *