जामनेरात दोन कोरोना बाधित निघाल्याने प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा

जामनेर सिटी न्यूज

जामनेर शहर प्रतिनिधी एस के पोळ >> शहरातील 23 तारखेला मृत झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन महिलेच्या संपर्कातील नऊ व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले आहे. शहरातील पाचोरा रस्त्यावरील नगरातील व्यक्तीचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला असुन त्यांच्या संपर्कातील तीन व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. जामनेर शहरातील नागरिकांनी सावधानता बाळगा, सुरक्षित अंतर ठेवा, तोंडाला मास्क वापरा…अशा बरेचश्या सूचना प्रशासन देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *