जांभोरा धरणगाव प्रतिनिधी : काही अंतरावर असलेल्या जांभोरा रेल्वेगेट येथे दुरुस्तीसाठी पाच दिवस बंद राहणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासन यांच्याकडून देण्यात आली आहे.
या ठिकाणावरून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. धरणगाव शहरापासून जवळच असलेले जांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस राहणार बंद राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाने कळविले आहे की, ५ ऑक्टोबर सकाळी ७ वाजेपासून तर १० ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच येथून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. त्यात अमळनेर जाणाऱ्यांसाठी टाकरखेडा मार्ग तर पारोळा जाणाऱ्यांनी एरंडोल मागार्चा अवलंब करावा, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे. तरीही नागरिकांनी या सुचनेचे पालन करावे. व पर्यायी मार्गास अवलंब झाल्याने नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.