वीस महिन्यात अनेकदा अश्लिल मॅसेज ; जळगावातील १९ वर्षीय तरुणीची पोलिसांत धाव

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव निषेध

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील १९ वर्षीय तरुणीला अनोळखी नंबरावरून सतत अश्लील संदेश पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुजराल पेट्रोल पंपाच्या भागातील १९ वर्षीय तरुणी हि आपल्या आई व भावासोबत राहते. हि तरुणी शिक्षण घेत असून सध्याला लॉकडाऊन असल्याने घरीच अभ्यास सुरु आहे. या तरुणीकडे अँड्रॉइड फोनातील मोबाईल नंबर तिच्या आईच्या नावे आहे. शिक्षण घेत असतांना कॉलेजच्या वसतिगृहात २४ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १० वाजता अज्ञात नंबरवरून ” आय लव्ह यु गुड नाईट” असा मॅसेज आला. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२० रोजी, २७ फेब्रुवारी रोजी देखील पुन्हा मॅसेज आला. या कडे तरुणीने दुर्लक्ष केले.

लॉकडाऊनच्या काळात ती घरी असतांना ३१ जुलै २०२० रोजी पुन्हा अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. अनोळखी नंबर असल्यामुळे तरूणीने फोन उचलले नाही. ऑगस्ट महिन्यात चार ते पाच वेळा फोन आले, पण तरूणीने उचलला नाही.

दरम्यान, तरूणीने नंबर कोणाचा आहे याची विचारणा करण्यासाठी आलेल्या नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्ती उचलतो मात्र बोलत नाही. किंवा फोन उचलत नाही. काल १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता व्हॉटसॲपवर पुन्हा अश्लिल मॅसेज पाठविले. आतापर्यंत गेल्या २० महिन्यात ४३ मॅसेज अज्ञात व्यक्तीने पाठविले आहे. तरूणीने कंटाळून तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

रिड जळगावचे मत >> जसा या तरुणीने धाडस करून तक्रार केली आहे. तशीच तक्रार जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी बळी पडत आहे. त्यांनीही असेच एखादं पाऊल उचलावं आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा.