ट्रकवर दुचाकी धडकल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Jalgaon अपघात क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

प्रतिनिधी जळगाव >> कामावरुन घरी जात असलेल्या तरुणाची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. २४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता पाचोरा ते खेडगाव दरम्यान हा अपघात झाला.

देवेंद्र हिरामण चौधरी (वय २८, रा. पाथरी, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. देवेंद्र हा पाचोरा येथे एका कापड दुकानावर कामाला होता. २४ रोजी काम आटोपल्यानंतर तो दुचाकीने (एम.एच. १९ बी.डी. ९९७१) घरी जाण्यासाठी निघाला होता. पाचोरा ते खेडगाव दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (एम.एच. ०४ एफ.पी. १५४२) त्याची दुचाकी धडकली. या अपघातात देवेंद्र गंभीर जखमी झाला.

नागरिकांनी त्याला खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्यात शुन्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.