जळगावातील तरुणीला शिवीगाळ-मारहाण करत केला विनयभंग ; गुन्हा दाखल

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील एका तरूणीला शिवीगाळ-मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून सोनल हर्षल फुलझाडे आणि प्रकाश हिरालाल फुलझाडे दोन्ही रा. पाळधी ता.धरणगाव जि.जळगाव यांनी २७ फेब्रुवारी रोजी तरूणीच्या घरी येवून क्रिकेटच्या बॅटने मारहाण करण्यास सुरूवात केली.

यातील संशयित आरोपी महिला सोनल फुलझाडे हिने देखील चापटा व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर प्रकाश फुलझाडे याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला.

तरूणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ श्रध्दा रामोशी करीत आहेत.