२५ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> आज मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १२२, जळगाव ग्रामीण-०९, भुसावळ- ०४, अमळनेर-०२, चोपडा-३३, पाचोरा-१०, भडगाव-०१, धरणगाव-०२, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-१८, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-२०, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण २७९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५९ हजार ८६४ पर्यंत पोहचली असून ५६ हजार ५५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १३८१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १९२९ रुग्ण सध्या उपचार घेताय.