पुण्यासाठी जळगावातून दररोज तीन जादा बसेस

Jalgaon जळगाव पुणे

जळगाव प्रतिनिधी ::> दिवाळीसाठी गावाकडे आलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गावर आहेत.

अर्थात, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव आगाराने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे.

त्यात पुण्यासाठी दररोज तीन बसेस सोडल्या जात होत्या. मात्र, प्रवासी संख्या वाढती असल्याने तीन जादा बसेस सोडल्या जात आहेत.

तसेच औरंगाबाद, धुळे, नाशिक, चाळीसगाव, शिरपूर मार्गावरही जादा बसेस सोडण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख नीलेश पाटील यांनी दिली.