विनाकारण फिरणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव : रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरीकडे शहर पोलिसातही विनाकारण फिरणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप दौलत इंगळे (४०, रा.कांचन नगर) व अशोक हरी नेरकर (३३, रा.पिंप्राळा) या दोघांचा त्यात समावेश आहे.शहर पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक जगदीश मोरे, नीलेश बडगुजर, रईस शेख व माधव तरबुडे यांचे पथक टॉवर चौकात बंदोबस्ताला असताना प्रदीप इंगळे हे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.यु.४२७६) तोंडाला मास्क न लावता चौकात आले. त्याचवेळी अशोक नेरकर हे त्यांच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.बी. ४६९९) ने तोंडावर मास्क न लावता टॉवर चौकातून जात होते. चौकशीत दोघं जण विनाकारण फिरत असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *