जळगाव-तरसोदच्या वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ; नशिराबाद पोलिसात नोंद

Jalgaon अपघात क्राईम जळगाव नशिराबाद

जळगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील तरसोद येथील रहिवासी रामसिंग गोपाल राजपूत (वय ७२) या वृद्धाचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील तरसोद येथील रहिवासी रामसिंग गोपाल राजपूत यांचा तरसोद शिवारातील रेल्वे डाऊन लाईनजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला असून या घटनेची माहिती स्टेशन मास्टर यांना मिळताच त्यांनी तात्काळ नशिराबाद पोलीस ठाण्यात खबर दिली. यावेळी पोलीस कर्मचारी रुपेश साळवे यांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.