जळगावात ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेवून आत्महत्या ; कारण ?

Jalgaon क्राईम

जळगाव >> बिबा नगर येथील युवराज पुंडलिक पाटील (५५) यांनी मध्यरात्री छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज पुंडलिक पाटील हे सेक्टर नं. २ बिबा नगर येथे दोन मुलांसह वास्तव्याला होते. गुरुवारी रात्री ११.३० वाजता मुलगा रवींद्र पाटील हा कामावरुन घरी आला होता. सोबत जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री युवराज पाटील यांनी छताला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगा रवींद्र हा उठल्यानंतर वडीलांनी गळफास घेतल्याचे त्याला दिसले. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला.प्राथमिक तपास हवालदार मगन मराठे करीत आहे.

जॉईन व्हा आमच्या फेसबुक पेजला.
Read Jalgaon

फॉलो करा आमच्या इंस्टाग्राम पेजला… Read Jalgaon News

Twitter Updates साठी फॉलो करा…ReadJalgaon

रिड जळगाव वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा.
readjalgaon@gmail.com

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईन होण्याकरिता लिंक वर क्लिक करा.

रिड जळगाव न्यूज 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *