पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने दिलेल्या घरात सुरु होता कुंटणखाना ; पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्का!

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव >> पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने दिलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर सोमवारी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. त्यात घर मालक, मालकीन व दोन तरुणी अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, आपल्या मालकीच्या घरात असा प्रकार सुरु असल्याचा प्रकार ऐकून पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्का बसला आहे. याबाबत हा कर्मचारी अनभिज्ञ होता. वाघ नगरातील शिक्षक कॉलनीत हा प्रकार सुरु होता.

घराचा भाडेकरु रिक्षा चालक असून तो पत्नीसह या घरात रहात होता. नांदूरा व सुरत येथील दोन तरुणींच्या माध्यमातून तो कुंटणखाना चालवत होते. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनाच मिळाली होती. त्यावरुन सोमवारी ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी वाघ नगरातील शिक्षक कॉलनीत एका घरात बनावट ग्राहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे तीन महिला व एक पुरुष असे चार जण आढळून आले.

पोलीस कर्मचारी अनभिज्ञ >> पोलिसांनी दोन तरुणी व पती-पत्नी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घराचे मालक पोलीस दलात कर्मचारी असून ते शहरातच कार्यरत आहेत. या व्यवसायाबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. ते अनभिज्ञ होते. कारवाईची माहिती मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्याला धक्काच बसला. दरम्यान, या चारही जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *