जळगावात मारहाण करत महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील सावखेडा रोड परिसरात दिलेले पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या ४३ वर्षीय महिलेला दाम्पत्याने मारहाण करत, तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नवरा बायकोविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एका भागात राहणार्‍या महिलेचे सावखेडा रोड परिसरातील रहिवासी श्रीकृष्ण तुकाराम मेंगे व ज्योती मेंगळे या दाम्पत्यांकडून पैसे घेणे आहे. ते पैसे घेण्यासाठी महिला २५ रोजी गेली होती.

पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करेन असे महिलेने सांगितले. त्याचा राग आल्याने श्रीकृष्ण मेंगळेससह त्याची पत्नी ज्योती या दोघांनी महिलेस लाकडी दांडा तसेच लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच पोलिासत तक्रार दिली तर तुझ्या पैशांमधून २ लाख रुपये कापून घेवून अशी धमकी महिलेला देवून तिचा विनयभंग केला.

महिलेच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रत्ना मराठे ह्या करीत आहेत.