जळगावात दारू पिण्यासाठी पैसे मागत रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव >> गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे मागत एका रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला केला. तसेच रिक्षाचालकाच्या पत्नीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

२५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता शिवाजीनगर हुडको भागात ही घटना घडली. पोलिसांनी या गुन्हेगारास अटक केली आहे.

गजानन बाविस्कर (रा. शिवाजीनगर हुडको) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शिवाजीनगर हुडको भागात राहणारे जनार्दन सोमनाथ कोळी (वय ४३) हे रिक्षाचालक आहेत.

२५ रोजी रात्री ते रिक्षेने घराकडे जात असताना गजानन बाविस्कर याने त्यांची रिक्षा अडवली. दारू पिण्यासाठी पैसे मागितले. कोळींना नकार दिल्याने त्याने चॉपरने हातावर वार केला.