
न्यायालयीन कारवाई मुळे सुरेशदादा जैन हे राजकारणातून थोडं बाजूला झाले, तेव्हापासून जळगावच्या इतर नेत्यानी (पक्षांच्या)जळगावची धुरा हातात घेतली, दावे मोठमोठी झाले, पण आजतागायत कोणत्याही पक्षाच्या नेत्याला यश आले नाही, हे कटू सत्य सर्व पक्षाच्या नेत्यांना मान्य करावेच लागेल, कारण भौगोलिक दृष्ट्या व आर्थिक बाजारपेठ असलेल्या या शहराचा विकासाचा बेडा उचलण्यास कोणी तयार नाही किंबहुना त्यांना त्यात रस नाही, आजही गेल्या 2 दशकापासून महापालिका शहरवासीयांना मूलभूत व उत्तम सेवा देण्यास अकार्यक्षम ठरली आहे।
खूप चांगले आयुक्त आले पण त्यांना इथे जमुच दिले नाही कारण ते फक्त शाळामास्तर सारखे कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यातच राहून निघून गेले। त्यामुळे प्रशासन पूर्णतः निष्क्रिय ठरले, पण 2 ते चार महिन्यात शहराचा चेहेरा मोहरा बदलणारे आज दिसून येत नाही एकतेचा संदेश देणारे प्रशासन व लोकप्रतिनिधी जर विकासासाठी एकत्र येऊ शकत नाही तर समान्यांकडून काय अपेक्षा धराल, आज दरवर्षी या शहरातून कुटूंब स्थलांतर होत आहे। पण कोणी नवीन कुटुंब या शहरात दाखल होत नाही।त्यासाठी परिवर्तनाची गरज आहे। ही जनतेची गरज भागविणारा कोणी राजकीय हिरो असल्यास दाखवा।
लेखन : विजय भा पवार