जळगाव जिल्ह्यात कोसळणार आणखी ४ दिवस पाऊस

Jalgaon जळगाव

जळगाव ::> जिल्ह्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी आणि आज शनिवार रोजी पावसाने जाेरदार हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काेसळ धार बरसणाऱ्या पावसाने जळगाव जिल्ह्याला झाेडपून काढले आहे. येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे येथील भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला आहे.

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत सरासरीच्या तब्बल ११६.७ टक्के पाऊस झाला. जून ते अाॅगस्ट दरम्यान अपेक्षित पावसाच्या तुलनेत या तीन महिन्यात १३३.५ टक्के तर सप्टेंबरमधील पावसाच्या ८८ टक्के पाऊस झालेला आहे.

नगरदेवळा गावाच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या अग्नावती नदीला पहाटे पुन्हा पूर आला. या पूराचे पाणी बाजारपेठेत शिरले. तीन दिवसांपूर्वी पूर आल्याने दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *