पत्नी माहेरी गेलेली असताना पतीची राहत्या घरात आत्महत्या

आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा येथे पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना पतीने स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

अनिल शंकर पाटील (वय ३८, रा. पिंप्राळा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. अनिल हा व्यवसायाने प्लंबर होता. त्याची पत्नी ही दोन मुलांसह माहेरी निघून गेलेली आहे. शनिवारी रात्री तो घरात एकटाच होता. मध्यरात्री त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ९ वाजता भावाला अनिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात नोंद केली आहे.