रात्री नऊ वाजेनंतरही सुरू असलेल्या दोन बियरबारवर कारवाई

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहेत. नियम तयार करीत आहेत. अशात बियरबार, हॉटेल्स यांना रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बसस्थानक परिसरातील हॉटेल श्री स्टार पॅलेस व कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल जलपरी यांच्यावर २३ रोजी रात्री कारवाई करण्यात आली.

गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स व बियरबारमध्ये ५० टक्के क्षमतेसह सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवल्यास राज्य उत्पादन शुल्कचे गस्त पथक कारवाईसाठी फिरत आहेत.

२३ रोजी रात्री या पथकांना हॉटेल श्री स्टार व जलपरी या दोन्ही हॉटेल्स रात्री नऊनंतर सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार या दोन्ही हॉटेल्सच्या परवानाकक्ष अनुज्ञाप्तींवर विभागीय गुन्हे दाखल करण्यता आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने कळवले.