जळगावातील पोलिस कर्मचाऱ्याचा रात्री गल्लीत दारू पिऊन गोंधळ

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा निषेध पाेलिस

जळगाव >> साई संस्कार कॉलनीमध्ये राहणारा एक पोलिस कर्मचारी दररोज रात्री मित्रांसोबत दारू पिऊन गल्लीत गोंधळ घालत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

नागरिकांना दम देणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात त्या परिसरात राहणारे जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

वाघनगर परिसरातील साई संस्कार कॉलनीमध्ये काही दिवसांपासून पोलिस कर्मचारी सुनील सैंदाणे वास्तव्याला आले आहे. त्यांची नेमणूक पोलिस मुख्यालयात करण्यात आलेली आहे. ते रात्री मित्रांसोबत दारू पिऊन उशिरापर्यंत कॉलनीतील गल्लीमध्ये आणि ओपन स्पेसमध्ये हा कर्मचारी गोंधळ घातल असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीसोबत कॉलनीतील नागरिकांच्या व्हॉट्सअप गृपवरील माहिती आणि व्हिडीओ पुरावा म्हणून देण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक आणि रामानंद पोलिस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आंहे.