जळगावात जुगार खेळणाऱ्या दोघांवर कारवाई

Jalgaon क्राईम जळगाव पाेलिस

जळगाव ::> भिलपुरा चौकात सट्टा खेळणाऱ्या दोघांवर शनिपेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता कारवाई केली. यात शैलेश सुरेश सुरळकर (वय ३८, रा. जोशीपेठ) व शरद भगवान चौधरी (वय ५५, रा. मेस्कोमातानगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ हजार २३० रुपये व सट्टा खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे. दिनेशसिंग पाटील, अभिजित सैंदाणे, राहुल पाटील, किरण वानखेडे, अमोल विसपुते, अश्विन हडपे यांनी कारवाई केली.