जळगाव ::> शर्माजी की रसोई या सोशल मीडियावरील चॅनल चालवणाऱ्या गणेवाडीतील महिलेची ८४ हजार ९९४ रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गणेशवाडीतील सीमा राजेश शर्मा या शर्माजी की रसोई या नावाने सोशल मीडियावरील चॅनल चालवतात. त्याबाबतचे पैसे त्यांना बँकेतील खात्यात मिळतात. २३ सप्टेंबर रोजी सोशल माध्यमाने मेलव्दारे खात्यात पैसे जमा केल्याबाबत त्यांना कळवले होते. मात्र, त्यांना पैसे मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी गुगलवर कोटक बँकेचा क्रमांक सर्च केला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील भामट्याने त्यांना क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर त्यांचा सीआरएन क्रमांकही विचारल्यानंतर आठ वेळा शर्मा यांच्या खात्यातून ८४ हजार ९९४ रुपये काढून ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.