जळगावात वाहनाच्या धडकेत पाडळसेच्या माजी पोलिस पाटलाचा मृत्यू

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> शिरसोली रस्त्यावर अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या यावल तालुक्यातील पाडळसे गावच्या माजी पोलिस पाटील यांना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघातीची नोंद करण्यात आली आहे.

श्रीधर कौतिक तायडे (वय ७०) असे मृत माजी पोलिस पाटील यांचे नाव आहे. तायडे हे मुलगा अनंत तायडे यांच्याकडे शुक्रवारी येणार होते. सकाळी ११.३० वाजता ते जळगाव बसस्थानकात उतरले होते. मात्र, मुलाच्या घराचा रस्ता त्यांना सापडला नाही. त्यामुळे ते शिरसोलीकडे जात होते.

सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्याने पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तायडे हे १९८४ ते १९९७ पर्यंत पाडळसे गावचे पोलिस पाटील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *