कुलगुरुंची बदनामी केल्याने एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठेंना विद्यापीठाची १ कोटी रुपये भरपाईची नोटीस

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> भुसावळ येथील पी. के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुदत संपल्यावरही विद्यापीठाने त्यांची नियुक्ती कायम ठेऊन लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठेंनी केला हाेता. त्यांनी कुलगुरुंची बदनामी केली म्हणून १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अशी नोटीस विद्यापीठाने पाठवली आहे.

पैसे घेऊन विद्यापीठाने मुदत संपल्यावरही डॉ. मंगला साबद्रा यांची प्राचार्य पदावरची नियुक्ती तशीच ठेवली, अशा आशयाचे पत्रक देवेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीसाठी दिले होते. या प्रकरणात कुलगुरुंशी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोपही केला होता.

या वृत्तामुळे विद्यापीठाची बदनामी झाली, म्हणून विद्यापीठाच्यावतीने प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांच्या स्वाक्षरीने देवेंद्र मराठे यांना अॅड. सुशील अत्रे व अॅड. निशांत अत्रे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. मराठे यांनी लेखी व बिनर्शत माफी मागावी, तसेच १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई करावी अन्यथा त्यांच्या विरुध्द दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल असेही या नोटीस मध्ये म्हटले आहे. या नोटीसची प्रत राज्यपालांनाही पाठवली आहे.