प्रतिनिधी जळगाव >> कोरोना विषाणूचे संक्रमण नागरिकांत मोठ्या तीव्रतेने पसरण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लग्न समारंभ, गर्दीचे कार्यक्रम व अंत्ययांत्रांवर निर्बंध लागू केले आहेत.

बंदीस्त किंवा मोकळ्या जागेत जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे, कार्यक्रम पार पाडावे लागतील. अंत्ययात्रेला केवळ २० लोकांना उपस्थित राहता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरपासून पुढील आदेश होईपर्यंत निर्बध लागू करण्यात आले आहेत. बंदिस्त जागेत किंवा मोकळया जागेत होणारे लग्नसमारंभ हे केवळ ५० लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील.

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठया प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम हे केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत बंदिस्त जागेत किंवा मोकळया जागेत साजरा करता येतील.

अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल. त्यामुळे नागरिकांनी नियामाचे पालन करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *