२७ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

Jalgaon Jalgaon MIDC जळगाव जळगाव जिल्हा

रिड जळगाव टीम >> जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २८८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळल्याने प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे १५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १३९, जळगाव ग्रामीण-०८, भुसावळ- १४, अमळनेर- ०८, चोपडा-१५, पाचोरा-१३, भडगाव-११, धरणगाव-०३, यावल-०५, एरंडोल-२२, जामनेर-१५, रावेर-०२, पारोळा-०४, चाळीसगाव-१७, मुक्ताईनगर-०८, बोदवड-०२, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६० हजार ४७० पर्यंत पोहचली असून ५६ हजार ८४५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १३८४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २२४१ रुग्ण सध्या उपचार घेताय.