नवऱ्याने तोंडावर उशीने दाबून केला कांचनचा खून ; माहेरच्यांचा आरोप

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव

जळगाव >> शहरातील कांचननगर परिसरातील रहिवासी प्रमोद शेटे या तरुणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिच्या मृत्युनंतर प्रमोदने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्त्या केल्याने एकच खळबळ उडाली. पत्नी या जगात नसल्याने आपल्यालाही जगण्यात रस (इंट्रेस्ट) नाही, असे म्हणत त्याने तोंड न दाखवताच रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. दरम्यान, तिच्या तोंडावर उशीने दाबून कांचनचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

प्रारंभी कांचन हिने विषय प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तथापि, तिच्या माहेरची मंडळी जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर त्यांनी कांचनने विष प्राशन केले नसून प्रमोद शेटे याने तिच्या तोंडावर उशी दाबून धरल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. बाजूलाच उशी पडलेली असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.

दरम्यान, कांचन हिच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर हंबरडा फोडल्याने वातावरण भावविवश झाल्याचे दिसून आले. तर या प्रकरणी आता शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.