त्या वाळू वाहनांवर कार्यवाही बाबत संभ्रम कायम, प्रांताधिकाऱ्यांनी रात्री पकडली होती वाहने

Jalgaon जळगाव

जळगाव – शहरातील शिवाजी नगर रोड ते ममुराबाद रोडावर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी थेट मंगळवार दि १९ रोजी रात्री ९:३० ते १० दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही केली होती, महिला अधिकारी असताना प्रांताधिकारी चौरे तहसीलदार संचेती दोघे पोलीस बंदोबस्त नसताना देखील आपले कर्तव्य बजावीत आहे, मात्र ही वाहने कार्यवाही न करता सोडण्याकरिता मोठ्या प्रमाणात राजकीय खटाटोप सुरू असून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही बाबत संभ्रम निर्माण झाला आहे जप्त केलेल्या वाहनांवर कार्यवाही खरच होणार काय? याप्रकरणी विविध तर्क देखील लावले जात आहे, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी दि१९ रोजी जप्त केलेली आर. टी. ओ कार्यालयात लावण्यात आलेली आहे मोहाडी,खेडी,कानळदा परिसरातील वाहनांवर कार्यवाही केल्याचे समोर आले आहे.

महसूल विभागाला सर्वाधिक काळे डाग वाळू व्यवसायामुळे लागल्याचे अनेक वेळा समोर आले आहे, लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात जळगावात कोरोना संक्रमण असताना वाळू माफियांचा मात्र हैदोस सुरूच आहे, प्रशासन कोरोना विरोधातील लढाईत व्यग्र असताना वाळू चोरी सरार्सपणे सुरू आहे. जप्त केलेल्या वाहनांवर कार्यवाही होते का ? याबाबत प्रश्न कायम आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातून अनेक वेळा वाहने पळविल्याच्या घटना घडल्या असून त्या वाहनाचा थांग पत्ता अद्याप पर्यत लागलेला नाही वाहने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात तलाठी , कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर असताना वाहने पळविणे सुरूच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *