जिल्ह्यात ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू

Jalgaon जळगाव

जळगाव > कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून संसर्गावर नियंत्रण सुरू आहे. तरी देखील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. त्याचे पालन होण्यासाठी त्याचप्रमाणे नागरिकांनी सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, धार्मिक दिंडी अशा स्वरुपांचे कार्यक्रम घेऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक आदेशाची आवश्यकता आहे. यामुळे जिल्ह्यात सहा एप्रिलपर्यंत कलम ३७ (१) (जमावबंदी) आदेश लागू करण्यात आले आहेत.

या काळात शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड, शस्त्र सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे जमा करणे आणि बरोबर नेण्यास बंदी आहे.

इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक, प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, तशी चिन्हे, चित्रे, फलक लावणे या कृत्यांनाही बंदी घालण्यात आली आहे.

तसेच मुंबई पोलिस अधिनियम २९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) प्रमाणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यांस सबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.