जळगावात तरुणाने अश्लिल हातवारे करत तरुणीची छेडछाड ; नागरिकांचा तरुणाला बेदम मारहाण

Jalgaon क्राईम जळगाव रिड जळगाव टीम

जळगाव >> शहरातील बेंडाळे कॉलेज समोरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणीला अश्लिल हातवारे करून छेड काढणाऱ्या तरूणाला पकडून नागरीकांनी चांगलाच चोप दिला असून जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. हा प्रकार दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. अंदाजे अठरा ते वीस वर्षीय तरूणी दुचाकीने आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बेंडाळे कॉलेज समोरून घरी जात असतांना भारत नानकराम रामचंदाणी (वय-२१) रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा तरूणीकडे पाहून दुचाकीचा हार्न वाजवित होता. हार्न का वाजविला असा जाब विचारला असता त्याने अश्लिला भाषा वापरून हातवारे केले. तरूणीने आरडाओरड करताच नागरीकांनी त्याला पकडून चांगलीच बेदम मारहाण केली. यावेळी निर्भया पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान तरूणीच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात भारत रामचंदाणी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.