एरंडोल पंचायत समितीत एकही कर्मचारी वेळत हजर नाही

एरंडोल

एरंडोल – (प्रतिनिधी) :>> राज्य सरकारणे सत्येवर येताच शासकीय कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा करून शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सांय.६.३० अशी केली आहे. तरी मात्र एरंडोल पंचायत समिती कार्यालयात सकाळी १०.३० मिनिटानी शिपाई वगळता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. काही शेतकरी प. समितीच्या आवक -जावक टपाल कक्षात जि. प. सदस्य योजनने अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मोटर पंम्मचे प्रकरण घेवून कर्मचारी येण्याची वाट पाहत उभे होते.

सलग तीन ते चार दिवसांपासुन आम्ही हे प्रकरण जमा करण्यासाठी भिरत आहोत परंतू आवक -जावक टपाल कर्मचारी रजेवर आहे. असे सांगुन आमचे प्रकरण कोणी ही स्विकारत नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले
शासकीय कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी, की नागरिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी असतात अशी चर्चा शेतकरी यांच्यात चालू होती.


कार्यालयातील एकादा कर्मचारी रजेवर असल्यास त्याच्या कामकाजाचा चार्ज हा दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपवला जातो. असा नियम आहे. परंतू काही नियमांची अंमलबजावणी एरंडोल पंचायत समिती मध्ये केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *