Video : जळगाव शहरात पाटबंधारे विभागाचा अजब-गजब कारभार…तर राज्य महामार्गावर वाहनांच्या गर्दीत चक्क रुग्णवाहिकेला १० मिनिटांचा अडथळा!

Jalgaon जळगाव
Read Jalgaon News  subscribers Please!

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव शहरातील रस्त्यावरील मोठे -मोठे खड्डे बुजविण्यासाठी पाटबंधारे विभाग दि. 03 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मानराज पार्क येथे रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे बुजवीत असताना वाहनांची मोठी रांग लागली.

जळगाव शहरात नागपूरहून येणारे वाहने यांची रांग अर्धा ते एक किलो मीटर पर्यंत लागली व मुंबईहून येणारी वाहने यांची रांग गुजराल पेट्रोल पंप पर्यंत लागली होती. नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची वेळ ही चुकीची असून खड्डे बुजवण्याची वेळ ही एक तर रात्री आठ वाजयच्या पुढे किंवा सकाळी सात वाजता च्या आत ठेवायला पाहिजे होती.

कारण सायंकाळी नागरिक आप आपले कामे आपटून घराकडे जाण्यासाठी रवाना होतात तर पाटबंधारे विभागाकडून हे खड्डे बुजवण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता काम करण्यात आली यावेळी वाहनांची रांग लागली होती व त्यावेळी अतिआवश्यक दवाखान्यातील पेशंट घेऊन ॲम्बुलन्स अवघ्या पाच ते दहा मिनिटं या वाहनांच्या रांगा मध्ये अडकली होती. यावेळी एम्बुलेंस मधून नेत असलेल्या पेशंट यांच्यासोबत काही अपघात होऊ शकला असता त्यातच बरेच मोटारसायकल स्वार व्यक्ती हे आपली मोटरसायकल जीव मुठीत घेऊन वाट काढत असताना बरेच मोटर सायकलस्वार हे खाली पडले त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

प्रतिनिधी सागर पाटील जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *