जळगाव शहरात महानगरपालिकेची अतिक्रमण करणाऱ्या फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्यावर बेधडक कारवाई

Jalgaon जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना सारख्या भयंकर आजाराने थैमान घातले आहे व कोरोना रुग्णांची संख्या जळगाव जिल्ह्यात दोन हजाराच्या पार झाली आहे. या महाभयंकर आजाराला फुल स्टॉप लावण्यासाठी प्रशासन पूर्णतः प्रयत्न करत आहे, जसे की जळगाव शहरातील फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्याकडून अतिआवश्यक वस्तूंची हात विक्री होत असताना कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टिंग न पाळता अत्यावश्यक वस्तूंची विक्री होत आहे.

यामध्ये जनतेला कोरोना सारखा आजार होण्याची शंभर टक्के दाट शक्यता आहे. सोशल डिस्टिंग पाळावे म्हणून महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यानी जळगाव शहरातील गणेश कॉलनी खाजमिया दर्ग्याजवळ फुल विक्रेते व फळ विक्रेता व छोटे व्यवसायिक यांच्यावर बेधडक कारवाई केली आहे.

दुसरी बाजू म्हटली म्हणजे छोटे व्यवसाय यांनी व्यवसाय करावा तरी कसा असा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे. कारण त्यांनाही परिवार आहे असे व्यवसायिक यांच्याकडून बोलले जात आहे, आतापर्यंत राज्य सरकार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत या छोटा व्यवसायिकांना मिळालेले नाही या सगळ्या गोष्टी फक्त कागदावरच राहिल्या यामुळे नियमांचे पालन करून दोन महिने लॉकडाऊन नियमांचे पालन केले.परंतु आता वेळ उपासमारीची येत असल्या कारणाने म्हणून छोटा व्यवसायिकांना अशा प्रकारे आपल्या परिवारासाठी फळे विक्री भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करावी लागत आहे. जरी महानगरपालिका ने या छोट्या व्यवसायासाठी जागा उपस्थित करून दिली असली तरी त्या ठिकाणी पाऊस पडल्यावर चिखल,वारा,पाऊस इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागत आहे व ही जागा मोक्याच्या ठिकाणी नसल्यामुळे अनेक अडचणी उद्भवत आहे.

प्रतिनिधी
सागर पाटील जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *